About Us

About VilasVhatkar.org  

Vision, Mission & Why VilasVhatkar.org 

VilasVhatkar.org matchmaking and other Services founded with simple objective to help people to find happiness.

This platform is only meant for the people with Bonafide intent to enter into a matrimonial and is NOT meant for Dating Purposes.

VilasVhatkar.org focuses on providing detailed family background information to help you to take next step with Confidence.

We understands the importance of choosing the right partner for marriage, Not only in India but also world wide.

We are Technology driven, providing the best platform to those who are genuinely looking for their Soulmate.

With over 100 + Communities from where you can find a Life Partner from your own Community.

Register with VilasVhatkar.org Matrimonial Website & Start searching the right Life Partner for you.

EASY & FREE Registration with Many Benefits.

FREE Access to Mobile Numbers & Addresses.

Verified through all the necessary Documents & Mobile Number.


श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांच्याविषयी
About Mr. Vilas Namdeorao Vhatkar

विलास नामदेवराव व्हटकर यांचा परिचय व कार्य


वडिलांचे नाव : कै. स्वातंत्र्यसैनिक व दलित मित्र श्री. नामदेवराव गिरजाप्पा व्हटकर.
आईचे नाव : श्रीमती सुभद्रा.
जन्म तारीख : ११ ऑक्टोबर १९५४.
जन्म गाव : मु.पो.उपळे(माकडाचे), ता.व जि. उस्मानाबाद पिन ४१३५०१, महाराष्ट्र.
पत्नीचे नाव : सौ.शारदा(सेवानिवृत शिक्षिका - बृहन्मुंबई महानगर पालिका).
अपत्ते - दोन पुत्र : १) श्री. उन्मेष – बी.ई.(कॉम्प्युटर), एम.एम.एस.(फायनान्स) – विवाहीत व अमेरिकेत खाजगी नोकरी.

२) श्री. आशिष – बी.ई.(ईलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम्युनिकेशन्स), एम.एम.एस.(ऑपरेशन्स) – विवाहीत व मुंबईत खाजगी नोकरी.

शिक्षण : १)बी.एस.सी.(ऑनर्स)(केमेस्ट्री), १९७६,(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र).
२)एम.एस.डब्ल्यू.(लेबर वेल्फेअर व पर्सोनेल मॅनेजमेंट), १९७८, (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र).
३) महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(एमएस-सीआयटी) हा कोर्स जुलै २०११ मध्ये, माझ्या वयाच्या ५७ व्या वर्षी ८६% मार्क मिळवुन पुर्ण केला.

भाषेवरती प्रभुत्व : मराठी, इंग्लीश व हिंदी.
सवयी : निर्व्यसनी.

पूर्वी केलेल्या नोकरया : 
१) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी(मॅनेजमेंट ट्रेनी) – ऑक्टोबर १९७८ ते सप्टेंबर १९८०) – हिंदुस्तान ऑर्ग्यनिक केमिकल्स लि.(भारत सरकारचा अंगिकृत व्यवसाय) – रसायनी, जि. रायगड, महाराष्ट्र – राजीनामा.
२) अ) व्यवस्थापक(प्रशासन व कार्मिक) – (ऑक्टोबर १९८० ते जुलै १९९६)
२) ब) वरिष्ठ व्यवस्थापक(प्रशासन व कार्मिक) – (जुलै १९९६ ते सप्टेंबर २००१) – मॉडर्न फूड इंडस्ट्रीज(इंडिया) लि.( भारत सरकारचा अंगिकृत व्यवसाय) – मुंबई, नवी दिल्ली, उज्जैन व इंदोर(मध्य प्रदेश) व अहमदाबाद(गुजरात) – स्वेच्छानिवृत्ति.
३) मालमत्ता व्यवस्थापक(ईस्टेट मॅनेंजर)(डिसेंबर २००४ ते जून २००५) – (वसंत उत्सव सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कांदिवली(पूर्व), मुंबई – राजीनामा.
४) कार्मिक व्यवस्थापक(पर्सोनेल मॅनेंजर)(जून २००५ ते ऑक्टोबर २००५) – आलानासन्स लि.,कुलाबा, मुंबई – राजीनामा.
५) वरिष्ठ कार्यकारी(मानवी साधन व प्रशासन)(सिनियर एक्झीक्युटिव्ह(एचआर व अँडमिनीस्ट्रेशन) – (फेब्रुवारी २००६ ते ऑगस्ट २००६) – कॅपिटॉल इंडस्ट्रीज, गोरेगाव(पूर्व), मुंबई – राजीनामा.

सध्याचा व्यवसाय : समाजसेवक, नोंदणीकृत वधू-वर सूचक, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ईमेल/इंटरनेट, व्हॉट्सअप, वैयक्तिक संपर्क व फोनच्या माध्यमातुन विनामूल्य समाजकार्य.
ई-मेल पत्ता : vilassocialwork@gmail.com

सध्याचा निवासाचा व पत्रव्यवहाराचा पत्ता : १४०४, राशी टाॅवर, रेयान इंटरनॅशनल स्कूल जवळ, गोकुळधाम, गोरेगाव(पू), मुंबई ४०००६३, महाराष्ट्र.

Address :  1404, RASHI TOWER, NEXT TO RYAN INTERNATIONAL SCHOOL, GOKULDHAM, GOREGAON(E), MUMBAI 400063, Maharashtra.

व्हॉट्सअप भ्रमणध्वनी क्र.: +९१९८६९३८८३०३.

नोकरीत असताना केलेले उल्लेखनीय कार्य :
१) वयाच्या सव्वीसाव्या वर्षी व्यवस्थापक पदापासून कारकीर्दीला सुरुवात.
२) मॉडर्न फूड इंडस्ट्रीज(इंडिया) लि., येथे वरिष्ठ व्यवस्थापक(प्रशासन व कार्मिक) या पदावर कार्यरत असताना, कंपनीची दीड कोटी रुपयांची बचत केली. कंपनीने “चेअरमन्स अँवार्ड ऑफ एक्सलन्स” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.
३) राजभाषा हिंदीचा कार्यालयीन कामामध्ये परिणामकारक वापर केल्यामुळे अनेक पुरस्कार मिळाले.
४) कंपन्यांच्या धोरणानुसार अनेक अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागास वर्गीय व गोरगरीब गरजु लोकांना नोकरीला लावले व पदोन्नत्या व अन्य लाभ दिले.

नोकरीत असताना केलेले अन्य उल्लेखनीय कार्य :
१) ऑल इंडिया एम.एफ.आय.एल. ऑफिसर्स फेडरेशन, कोचिन, केरळचे कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम केले.
२) मॉडर्न फूड इंडस्ट्रीज(इंडिया) लि., मुंबई शाखेत एम.एफ.आय.एल. ऑफिसर्स असोसियेशन स्थापन करुन सचिव म्हणून काम केले.
३) १९८५ साली चारकोप मॉडर्न सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, चारकोप, कांदिवली(प), मुंबई येथे स्थापन करुन मुख्यप्रवर्तक व मानद सचिव म्हणून काम केले. पारदर्शकरित्त्या काम करुन, सदर संस्थेची इमारत बांधून पुर्ण केली व फ्लॅटच्या माध्यमातुन बारा कुटुंबांच्या निवारयाचा व सहा दुकानें व एक कमर्शियल हॉलच्या माध्यमातुन सात कुटुंबांच्या रोजी-रोटीचा प्रश्र सोडविला.
४) १९८७ साली चारकोप उत्कर्ष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, चारकोप, कांदिवली(प), मुंबई येथे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करुन, बारा फ्लॅटच्या माध्यमातुन बारा कुटुंबांच्या निवारयाचा व दहा दुकानांच्या माध्यमातुन दहा कुटुंबांच्या रोजी-रोटीचा प्रश्र सोडविला.

स्वयंसेवी व अन्य संस्थांशी संबंध:
१) इंडस्ट्रीयल रिलेशन्स इन्स्टीटयुट ऑफ इंडिया, मुंबईचे आजीव सदस्य.
२) संत कक्कय्या विकास संस्था, धारावी, मुंबईचे आजीव सदस्य.
३) वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळ, पुणेचे आजीव सदस्य.
४) वीरशैव संत कक्कय्या समाज मंडळ, पिंपरी-चिंचवड, पुणेचे आजीव सदस्य.
५) संत कक्कय्या विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, पुणेचे माजी विश्वस्त.
६) कै. सदगुरु श्री. वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन तत्वज्ञान, मुंबईचे नामधारक.
७) हाय-टेक बृहन्मुंबई निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, मुंबई - मार्गदर्शक/सल्लागार.
८) सखुमाई संभाजीराव शिंदे सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित(नियोजित), सोलापूर - सदस्य व मार्गदर्शक/सल्लागार.
९) डायमंड आइल ३ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, गोरेगाव, मुंबई – माजी व्यवस्थापन समिती सदस्य.

आजपर्यंत केलेल्या समाजकार्याचा तपशिल :
१) सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतुन ऑक्टोबर १९८० ते आजतागायत माझ्या वार्षिक उत्पन्नाच्या १०% रक्कम मी गरजु गोरगरीबांसाठी खर्च केली आहे व या पुढेही खर्च करत राहणार आहे.
२) नोकरीमध्ये असताना, सन १९८२-८३ मध्ये, संत कक्कय्या विकास संस्था, धारावी, मुंबई या अनुसूचित जातीपैकी ढोर/कक्कय्या समाजाच्या संस्थेस दहा हजार रुपयांची मदत केली.
३) इंटरनेट, व्हॉट्सअप व संगणक हे कमी खर्चामध्ये शिघ्र गतीने जगभर लेखी पत्रव्यवहाराचे प्रभावी साधन असल्यामुळे मी, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र   स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(एमएस-सीआयटी) हा कोर्स जुलै २०११ मध्ये, माझ्या वयाच्या ५७ व्या वर्षी ८६% मार्क मिळवुन पुर्ण केला आहे व मी यामध्ये पारंगत असुन मी स्वतः मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ईमेल/ व्हॉट्सअप द्वारे पत्रव्यवहार करतो.
मी इंटरनेट/व्हॉट्सअप च्या माध्यमातुन समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी विनामूल्य समाजकार्य करत आहे.
दिनांक ०१-०३-२०२१ रोजी माझ्याकडे एकुण ४५०० लोकांचे ईमेल आयडी आहेत. या ईमेल आयडी यादिमध्ये खेडी, शहरे, तालुक्याची व जिल्ह्याची ठिकाणे, महानगरे, भारतातील राज्यांच्या राजधान्या व अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, सौदी अरेबिया येथील भारतीयांचा समावेश आहे. तसेच ७५०० लोकांचे व्हाट्सअप मोबाईल नं. माझ्याकडे असुन २१०० लोक माझे फेसबुक मित्र आहेत.
४) समाजातील सर्व जाती धर्माच्या ७५००(सात हजार पाचशे) लोकांची वैयक्तिक माहिती जसे की, पुर्ण नांव, जन्म तारीख, उंची, रक्त गट व रक्तदान करण्याची इच्छा, विवाहाची तारीख, अपत्यांची संख्या, शिक्षण, धर्म, जात, शारिरीक व्यंग, राहण्याचा व जन्मगावचा पत्ता, नोकरी/व्यवसाय हुद्दा व त्याचा पत्ता, वैयक्तिक व कार्यालयाचा ब्लॉग/संकेतस्थळ, वार्षिक उत्पन्न, मोबाईल/दूरध्वनी क्र., ईमेल आयडी, व्यक्तिच्या समस्येचे स्वरुप, समाज उन्नतीसाठी काय केले पाहिजे व यासाठी माहिती देणारी व्यक्ति काय करु शकते वगैरे मी गोळा केली आहे.
मी स्वतः त्याचे संगणकीकरण करतो.
या माहितीचा वापर “नाही रे” व “आहे रे” व्यक्तिंची सांगड घालून गरजुचीं कामे विनामूल्य करण्यासाठी करत आहे.
भविष्यामध्ये या माहितीच्या आधारावर शासकीय योजनांमध्ये सुधारणा व नवीन योजना शासनाला सुचवणार आहे.
माझ्याकडे वैयक्तिक माहिती असलेल्या पुरूषांना, मी वाढदिवसाच्या व विवाहाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोन/व्हॉटसअप/एसएमएस/ई-मेलच्या माध्यमातून देत असतो.
५) मी, महाराष्ट्र शासनाच्या व भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांची, स्वयंरोजगारांच्या संधींचीं, शासकीय/निमशासकीय व खाजगी नोकरयांच्या उपलब्धतेसंबंधी संकेतस्थळांची/जाहिरातींची/लिंक्सची माहिती यादितील लोकांपर्यंत फोन/व्हॉटसअप/एसएमएस/ई-मेलच्या माध्यमातून मोफत पोहचवत असतो.
नोकरीच्या शोधात असणारयांचे प्राप्त सी.व्ही/बायोडाटा सर्क्युलेट करुन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो, ही सेवाही मोफत आहे.
करियर गाईडन्स देवुन यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षा तयारीसाठी प्रशिक्षण देणारया शासकीय/खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती लोकांना देत असतो.
विवाहेच्छुक तरुण तरुणींना जीवनसाथी शोधण्यासाठी त्यांची प्रप्त माहिती सर्क्युलेट करत असतो.
रक्तदान, नेत्रदान व देहदानासंबंधीचे कार्य करणारया व्यक्ति व संस्थांची माहिती सर्क्युलेट करत असतो.
गंभीर आजार व मोठया शस्त्रक्रियांसाठी अर्थिक सहाय्य देणारया स्वयंसेवी संस्थांची नांवे, पत्ते, फोन नं., ईमेल आयडी व संकेतस्थळ इत्यादी माहिती सर्क्युलेट करत असतो.
मानव जातीच्या कल्याणासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व मी इंटरनेटद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, पत्राद्वारे, फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटीद्वारे विनामूल्य करत असतो. हे काम करत असताना मला या कामातुन वेगळा आनंद व समाधान मिळत असते व हे काम मी अखेरच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे.
६) मी आत्तापर्यंत केलेल्या कामाची वानगीदाखल उदाहरणे पुढील प्रमाणे आहेतः

 
(क) आरोग्यविषयक बाबी जसे की, शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता, दोन्ही मुत्रपिंडे निकामी झालेल्या व्यक्तिसाठी आर्थिक मदत इत्यादि केसेसमध्ये माझ्या ईमेल यादीमधिल लोकांना ईमेल पत्रा द्वारे आवाहन करत असतो व लोक पुढे येवुन मदत करतात.

(क) (१) कु. सारिका प्रमोद शिंदे, वय २५ वर्ष, रा. ठि. मुंबई यांची दोन्ही मुत्रपिंडे निकामी झाली होती. मी माझ्या वैयक्तिक संबंधातुन मे. आलाना सन्स, मुंबई यांचे धर्मादाय फंडातुन रु. ४००००/-(रु चाळीस हजार फक्त) चेकद्वारे सदर मुलीच्या उपचारासाठी मिळवून दिले आहेत. सदर मुलीचे वडील श्री. प्रमोद बाबुराव शिंदे असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९८९२८९०३६६ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते.

(क) (२) सौ. सुवर्णमाला भाग्यवान शिंदे, वय ५२ वर्षे, रा.ठि. सोलापूर यांची दोन्ही मुत्रपिंडे निकामी झाली होती. मी स्वतः रु. ४०००/- (रु. चार हजार फक्त) माझ्या खिशातुन मदत केली आहे. तसेच आर्थिक मदतीसाठी मी माझ्या ईमेल आयडी यादितील लोकांना ईमेलद्वारे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवुन, सौदी अरेबियात नोकरी करत असलेले श्री. विजयसिंग रघुनाथ शिंदे यांनी रु. २०००/-(रु. दोन हजार फक्त), व डॉ. सौ. संगिता राजेश हसनाळे, मुंबई यांनी रु. १००००/-(रु. दहा हजार फक्त), कोअर बँकिंग प्रणाली द्वारे त्यांचे पती कै. श्री. भाग्यवान कृष्णाजी शिंदे यांच्या, युनियन बँक ऑफ इंडिया, सोलापूर कँप, सोलापूरच्या बचत खाते क्र. ४१०३०२०१०५०३३९५ मध्ये जमा केले होते. अशाप्रकारे एकुण सोळा हजार रुपयाची मदत त्यांना मिळाली आहे. सदर महिलेचे पुत्र श्री. साहिल भाग्यवान शिंदे यांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्र. +९१८२३७३८९३६० वरती संपर्क साधून या बाबतची सत्यता पडताळून पाहता येते.

(क) (३) श्री, नितेश दशरथ खरटमोल, वय २३ वर्ष, राहणार मुंबईहे Severe Generalized Acute Polyradiculoneuropathy(AIDP) या रोगाने आजारी होते, दिनांक २१-०९-२०१३ पासुन लिलावती हॉस्पिटल, वांद्रे(प), मुंबई येथे भरती होते व उपचारासाठी रु. २४ लाख खर्च अपेक्षित होता. आर्थिक मदतीसाठी मी माझ्या ईमेल आयडी यादितील लोकांना ईमेलद्वारे आवाहन केले असता दानशूर व्यक्तिंनी त्यांचे वडील श्री. दशरथ निगोजी खरटमोल यांच्या स्टेट बँक ऑफ इंडीया माहुल रोड ब्रँच, चेंबूर, मुंबई ४०००७४ बचत खाते क्रः ३३४९२६२०३३७ IFSCI CODE: SBIN0000564 मध्ये पैसे जमा केले आहेत. श्री, नितेश दशरथ खरटमोल यांचे चुलत भाऊ श्री. सुनिल गुंडप्पा खरटमोल यांच्याशी भ्रमणध्वनी क्र. +९१८९७६१३२९३९ वर याची खात्री करता येते.

(क) (४) श्री. संतोष सदाशिव मावरकर वय २६ वर्षे राहणार बँगलोर यांची दोन्ही मुत्रपिंडे निकामी झाली होती. त्यांना अर्थिक मदत करण्यासाठीचे आवाहन मी माझ्या ईमेल आयडी यादितील लोकांना ईमेलद्वारे करुन श्री. मावरकर यांच्या कॅनरा बँक, देवराजीवनहळ्ळी, बंगलोर मधिल बचत खाते क्र. ४१९१०११११८८० मध्ये मदत जमा करण्याची विनंती केली होती.
 
(ख) आंतर-जातीय विवाह केलेल्या खालील जोडप्यांना मी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिल्या जाणारया प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्याची माहिती देवुन लाभ घेण्यासाठी सुचविले आहेः

(ख)(१) श्री व सौ. लक्ष्मण सत्यविजय गावकर, चारकोप, कांदिवली, मुंबई. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९८६९५५४१३७ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते.

(ख)(२) श्री व सौ. मारुती रामलिंग नारायणकर, चारकोप, कांदिवली, मुंबई. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९८१९५००६९० असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते.

(ख)(३) श्री व सौ. अविनाश सुखदेव व्हटकर, भांडुप, मुंबई. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९५९५८९९८१० असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते.

(ख)(४) श्री व सौ. सचिन अर्जुन पवार, अंधेरी, मुंबई. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९३२४९८००३१ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते.
 
(ग) मी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंर्गत, भूमिहीन दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जातीच्या शेतमजूरास दिल्या जाणारया जमिनी बाबत माहिती देवुन लाभ घेण्यासाठी (१) श्री. संभाजी राजाराम नारायणकर, पांगरी, ता.बार्शी, जि. सोलापूर यांना सुचविले आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९६८९२१३३२४ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते. (२) श्री. सचिन जालिंदर रणखांबे, मोराळे-पेड, ता. तासगाव, जि. सांगली यांना सुचविले आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ८९७६८२७१८८ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते.
 
(घ) मी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे भारत सरकारकडुन कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणारया शिष्यवृत्तीसाठी श्री. निखिल दिलीप गायकवाड, मीरा रोड, जिल्हा ठाणे यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संबंधित अधिकारयाशी संपर्क साधून मदत केली. त्या विद्यार्थ्याचा भ्रमणध्वनी क्र. ९०२९०८१७३७ असुन यावरती संपर्क साधून सत्यता पडताळून पाहता येते.

(च) मी, महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिनांक २३ ऑगस्ट, २०१२ चे ई-मेल व स्पीड पोस्ट पत्र पाठवून मागासवर्गीयांच्या योजनासाठी असणारया उत्पन्न मर्यादेत/अटित महागाईच्या प्रमाणात आपोआप वाढ करणारया फॉर्म्युल्याचा समावेश करण्याबाबत व दोन शासकीय कर्मचारयांच्या व त्यांच्या कार्यालयाच्या हमीबाबतच्या जाचक अटि काढून टाकण्याबाबत विनंती केली होती.

(छ) मी, स्वतःच्या खिशातून रू. ८१००/- खर्च करून, रविवार दिनांक १८-१२-२०१६ पासुन सलग नऊ रविवार म्हणजे दि. १८-१२-१६, २५-१२-१६, ०१-०१-१७, ०८-०१-१७, १५-०१-१७, २२-०१-१७, २९-०१-१७, ०५-०२-१७ व १२-०२-१७ रोजी पुढील जाहिरात लोकसत्ताच्या मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर व औरंगाबाद अवृत्त्यामध्ये प्रसिद्ध केली – “मोफत ! सर्व जाती धर्मांसाठी वधू-वर सूचक श्री. विलास नामदेवराव व्हटकर(नोंदणीकृत) गोरेगाव मुंबई व अन्य सेवा ९८६९३८८३०३(व्हाट्सअप) vilassocialwork@gmail.com”. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे व मोफत अपेक्षानुरूप जीवनसाथी सूचवण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.

पारितोषिके :
१) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जाती धर्मांसाठी उत्कृष्ट मोफत समाजसेवेबद्दल दिनांक १ जुलै २०१८ रोजी पनवेल येथे, महाराष्ट्र चित्रपट महासंघ व साई सागर एन्टरटेन्मेंट, नवी मुंबईतर्फे, स्टार महाराष्ट्राचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार, डाॅ. भारत कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी, औरंगाबाद, महाराष्ट्र शासन यांचे हस्ते शानदार कार्यक्रमात मिळाला.
२) लोकसत्ता, मुंबईच्या वतीने छोट्या जाहिरातीमध्ये दडलाय बक्षीसांचा खजिना या स्पर्धेमध्ये विजेता. एक ग्राम सोन्याचे नाणे मिळाले.

कौतुक/कृतज्ञता/ सत्कार: 
लाभार्थ्यांचे व जनतेचे कौतुकाचे व कृतज्ञतेचे ईमेल, व्हाट्सअप पोस्टस व फोन मला येत असतात व स्वयंसेवी संस्था त्यांच्या कार्यक्रमामध्ये माझा सत्कार करत असतात.

Mr. Vilas Namdeorao Vhatkar born on 11-10-1954 at village Uple(Makdache) Tal and Dist. Osmanabad 413501, Maharashtra state is a B. Sc.(Hons.) from Marathwada University Aurangabad and M. S. W. from Shivaji University Kolhapur a renowned social worker working for career guidance, informing job vacancies and helping in life partner search to people of all religions and castes since 1980. He served in Government of India Enterprises viz Hindustan Organic Chemicals Ltd as Management Trainee in Rasayani Maharashtra and in Modern Food Industries (India) Ltd in Mumbai, Delhi, Indore, Ujjain and Ahmedabad as Senior Manager. He visited USA twice. 

He formed two co operative housing societies in Mumbai. He was working president of All India MFIL Officers Federation. He is recipient of Chairman's Award of Excellence for outstanding work in Modern Food Industries(India) Ltd. He is life member of :

1) Industrial Relations Institute of India, Mumbai. 

2) Sant Kakkayya Vikas Sanstha, Dharavi, Mumbai. 

3) Veershaiv Kakkayya Samaj Vikas Mandal, Pune. 

4) Veershaiv Sant Kakkayya Samaj Mandal, Pimpri-Chinchwad, Pune. 

He is Ex Trustee of Sant Kakkayya Vidhyarthi Kalyan Pratishthan, Pune. Follower of Jeevanvidya Mission, Mumbai. Ex Managing Committee Member of Diamond Isle III Co Op Housing Society Ltd. Goregaon, Mumbai. Advisor to High Tech Bruhanmumbai Nivara Co Op Housing Society Ltd. Mumbai and Sakhumai Sambhajirao Shinde Co Op Housing Society Ltd. Solapur. He helps needy people in getting financial help for medical treatment from institutions and individuals. He provides contact details of Government and private institutions for competitive examinations.